गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...

गणपतीच्या आरत्या, स्तोत्रे



भूपाळी गणपतीची
उठा उठा हो सकळिक वाचे स्मरावा गजमुख
ऋध्दीसिध्दींचा नायक सुखदायक भक्तांसी ॥ध्रु.
अंगी शेंदुराची उटी माथा शोभतसे कीरीटी
केशरकस्तूरी लल्लाटीं हार कंठी साजिरा ॥१॥
कानीं कुडलांची प्रभा चन्द्र-सूर्य जैसे नभा
माजीं नागबंदी शोभा स्मरतां उभा जवळी तो ॥२॥
कासें पितांबराची धटीं हाती मोदकाची वाटी
रामानंन्द स्मरतां कंठी तो संकटी पावतो ॥३॥

कहाणी गणपतीची
ऐका परमेश्वरा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळें, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळे, विनायकाची देवळे, रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं, अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबी भोजन करावं, अल्पदान महापुण्य. असा गणराज मनीं ध्याईजे; मनी पाविजें; चिंतिलं लाभिजे; मनकामना निर्विघ्न कार्यसिध्दी करिजे. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ, संपूर्ण

राधाकृत श्री गणेश स्तोत्र
आपले माणूस घर सोडून गेल्यास, अगर एखादी व्यक्ती गायब झाल्यास हे स्तोत्र आसन घेऊन एकाच बैठकीत १०१ वेळा म्हणावे. हरवलेली व्यक्ती परत येते. मात्र या स्तोत्राचे पठण पूर्ण श्रध्देने करावे लागते. तरच याचा फायदा होतो.

राधिकोवाच।
परं धाम परं ब्रह्म परेशं परमीश्वरम्
विघ्ननिघ्नकरं शांन्तं पुष्टं कान्तमनन्तकम् ॥१॥
सुरासुरेन्द्रै: सिध्देन्द्रै स्तुतं स्तौमि परात्परम्
सुरपद्मदिनेशं गणेशं मङ्गलायतनम् ॥२॥
इदं स्तोत्रं महापुण्यंम् विघ्नशोकहरं परम्
: पठेत् प्रातरूत्थाय सर्वविघ्नात् प्रमुच्यते ॥३॥
इति श्रीब्रह्मवैवर्ते राधाकृतं गणेशस्त्रोत्रं सम्पूर्णम्

No comments:

Post a Comment